OUR MISSION AND GOALS

"गतिमान शिक्षणातून समाज परिवर्तन" हे ब्रीदवाक्य स्वीकारुन सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व ग्रंथालय सुरु करण्यात आले आहे. अर्थात केवळ एक कोचिंग क्लास व ग्रंथालय चालविणे एवढेच संकुचित ध्येय नाही तर महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनाविषयीच्या सुक्ष्म आकलनातून सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व ग्रंथालय हा नवीन उपक्रम सुरु केला आहे. आज समाज लोकसेवा आयोगाच्या परीक्षांकडे परिवर्तनाचे साधन म्हणून पाहतो. आज नोकरशाहीच्या भूमिकेत बदल झाला असला तरी सामाजिक-आर्थिक विकासातील तिचे कार्य महत्वपुर्ण आहे. त्यासाठी गरज आहे ती सुजान, संवेदनशील व कार्यक्षम नागरीक तयार होण्याची हा व्यापक विचार लक्षात घेवून लातूर ग्रामीण व शहरी भागाबरोबरच संपूर्ण महाराष्ट्रभरातील स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आपल्या ॲकॅडमीच्या पोर्टलशी जोडले जाणार आहे व त्यांना एकाच ठिकाणी सर्व सुविधा उपल्ध करुन देणे हे या ॲकॅडमीचे मुख्य ध्येय असणार आहे.